Tuesday, 20 March 2018

जनावरांच्या गोठ्यात रबर (मेट) गादीचा वापर ठरेल फायदेशीर.....

जनावरांच्या गोठ्यात रबर (मेट) गादीचा वापर ठरेल फायदेशीर.....

     
आपण सभोवताली सर्वेक्षण करत असतो त्यावरून असे निदान होते कि, बहुतांशी गोठ्यात अस्वच्छता तसेच विस्कळीत व्यवस्थापन निदर्शनास येते.
1.      अस्वच्छतेमुळे बऱ्याचदा जनावरांस स्तनदाह रोगाला बळी पडावे लागते आणि जरी यातून वाचले तरी दुग्धोत्पादन व त्या जनावरांचा विकास घसरतो
2.      गोठ्यातील अस्वच्छतेमुळे जनावर बैचेन होते जर पायथ्याशी शेण काडीकचरा असेल तर जनावर खाली बसत नाही
3.      पाणी साचलेले असल्यास जनावर घसरण्याची शक्यता असते
4.      कधी – कधी गोठा बांधतांनी चढ-उताराचे व्यवस्थापन होत नाही व जनावरांस आल्हाददायक बसता येत नाही
5.      गर्भावस्थेमध्ये जनावरांची काळजी घेणे अनिवार्य असते त्यावेळेस जर पाय घसरला तर वाढ होणाऱ्या गर्भाला इजा होऊ शकते
6.      यांव्यतिरिक्त जर जनावरांच्या गोठ्यात अस्वच्छतेमुळे गोचीडींचा हि प्रादुर्भाव होतो,
7.      गोचीड जनावरांचे रक्त शोषतात व जनावर त्यामुळे अस्वस्थ होते त्याच्या दुध देण्याच्या प्रमाणात हि घट होते.
8.      गोचीडांच्या प्रादुर्भावांमुळे जनावरांचा विकासवाढीत परिणाम दिसून येतो
9.      उष्णतेमुळे हि जनावरांस कडकी बसते त्यामुळे हि जनावर अस्वस्थ होते
     यावर जर विचार करून आपल्या गोठ्यात रबर (मेट) गादीचा वापर केल्यास व्यवसायात वृद्धी होऊ शकते.
नेमकी रबर (मेट) गादी कश्यापासून बनली आहे? व त्याचा फायदा काय ?
1.      रबर गादी हि खास प्रकारच्या नैसर्गिक रबरापासून बनलेली असून त्यामुळे जनावरांस कुठल्याही प्रकारची अलर्जी (Allergy) होत नाही
2.      रबर गादीचे आकारमान विचार केला तर साधारणत: ६.५ फुट * ४ फुट,
७ फुट * ४ फुट अशा प्रकारांमध्ये बाजारात उपलब्ध असून यावर जनावर आरामदायी बसते
3.      रबर गादीची जाडी हि १५ mm १७ mmmm इतकी उपलब्ध आहे व अंदाजे वजन ४५ किलोपर्यंत असते व टिकण्याची क्षमता हि चांगली असते
4.       जनावरांस उठ-बस करता यावे (गाभण काळात अति फायदेशीर) व मालीश व्हावी याकरिता रबर गादीची रचना नक्षीपासून केलेली असते, त्यामुळे गादी चोपडी व तिचा घसारा हि होत नाही.
5.      पाणी, मूत्र शोषणरहित असल्या कारणास्तव जीवाणू तयार होत नाही. स्तनदाह आजारांचा प्रादुर्भाव कमी प्रमाणात दिसून येतो
6.      कासेला खडा किंवा गवताची काडी टोचून होणारी इजा टळते
7.      गुडघ्याला येणारी सूज कमी होते
8.      रबरी गादीमुळे जनावर स्वच्छ राहते व गादी स्वच्छ करण्यास हि सोपे जाते
9.      जनावर माती, सिमेंटफरशीवर बसण्यापेक्षा रबरी गादीवर बसवल्यास जनावरांस आराम मिळून खाद्यपाणी सेवन करण्याची क्षमता व उत्पादनात वाढ होते
10. खुरांची झीज होऊन होणाऱ्या जखमा व खुरांच्या आजारापासून हि सरंक्षण होते
11. तसेच म्हशीकरिता जर विचार केला तर खास नक्षीपासून बनविण्यात येते त्यामुळे रक्ताभिसरण प्रक्रिया सुलभ प्रकारे होऊन जनावर निरोगी राहते
     अशाप्रकारे जर रबर गादीचा वापर पशुपालकाने केल्यास जनावर निरोगी व आनंदी राहून उत्पादनात निश्चितच भर पडेन.

अधिक माहितीसाठी प्रा. अजय गवळी (८००७४४१७०२)


  

No comments:

Post a Comment