Tuesday, 20 March 2018

गाई म्हशीमधली प्रजनन व वंध्यत्व : समस्या व निवारण

                 

     गाई म्हशीमधली प्रजनन व वंध्यत्व : समस्या व निवारण

                
आपल्या गाई / म्हशी नियमितपणे व्याल्यास ती फायदेशीर ठरतात.गाईमध्ये वर्षाला वासरु, म्हशींमध्ये सव्वा वर्षाला पारडू जन्माला आले पाहिजे तसे न झाल्यास जनावराचे दूध उत्पादन कमी होऊन पशुपालन व्यवसायात शेतकऱ्यांचे आर्थिक नुकसान होते.
       जनावरांना प्रजोत्पादनक्षम वयात येण्यास उशीर होणे, गाई/म्हशी व्यायल्यानंतर 3 महिने उलटून ही माजावर येणे, गाई / म्हशी नियमितपणे माजावर येत असून कृत्रिम रेतन / वळूकडून फळवुनही वारंवार उलटणे. गाभडणे, मुका माज दाखवणे यामुळे जनावरांत वांझपणा येतो.
जनावरांतील माज कसा ओळखावा ?
जनावरांतील माज ओळखणे हि शेतकऱ्याच्या परिचयाची गोष्ट असते. नसेल तर ओळखता यायला हवेच कारण त्याशिवाय पर्यायच नाही. काही शेतकऱ्यांना जनावरांतील माज ओळखता आला नाही म्हनुन जनावर गाभण राहत नाही. परिणामी जनावर भाकड राहून त्यावर खाद्याचा व सांभाळनुकीचा खर्च वाढत राहतो व यांतून व्यवसायावर परिणाम होतो आणि कमी फायदा होतो आणि याची संपूर्ण झळ शेतकऱ्याला सोसावी लागते.

जनावर माजावर न येण्याची मुख्य कारणे :-

१.आहार :-
            जनावरांना दिला जाणारा हिरवा चारा व सकस आहार, पोष्टिक खाद्य याला फार महत्व असते. हिरव्या चारयात असणारी जीवनसत्वे मुख्यता : अ जीवनसत्व, आहरातून मिळणारी खनिजे व जनावरानची एकंदरीत तब्येत हे जनावर माजावर येण्यासाठी गरजेचे व आवश्यक असते.
            तुलनात्मक विचार करता उन्हाळ्यात हिरवा चारा काय तर पोटभर सुका चारा किंवा खाद्य मिळणे कठीण असते. अशा परीस्थितीत जनावर माजावर येणे अवघड असते.

२.वांझपणा :-
            जनावरांतील आनुवंशिकता व वारंवार असणारे आजार तसेच प्रजनन इंद्रियातील बिघाडामुळे कायम किंवा तात्पुरत्या स्वरूपाचा वांझपणा उदभवतो.
            मुद्देसूद नियमित नोंद ठेवून आणि सतत असणारी चौकशी यांमुळे बऱ्याच प्रमाणातील प्रश्न सुटण्यास मदत होईल. त्याकरिता खालील मुद्दे महत्वाचे आहेत-
Ø  गाय माजावर केव्हा आली
Ø  गाय केव्हा व्यायली
Ø  वितांना कोणत्या अडचणी आल्या
Ø  त्यावेळी कोणती औषधी देण्यात आली
Ø  व्याल्यानंतर पुन्हा माजावर केव्हा आली
Ø  गाभण राहण्यासाठी किती वेळा भरवावी लागली
Ø  जनावरातील भाकड काळ किती होता
Ø  दोन वितातील अंतर किती होते
Ø  वापरलेल्या वळूची सविस्तर असणारी माहिती इ.

            जर गायीचा एक माज ओळखण्यात असक्षम ठरल्यास तर भाकडकाळ हा पुढील २१ दिवसांनी लांबतो. मग तेवढ्या दिवसांचा पालन पोषणाचा खर्च अधिक वाढतो आणि गायीपासून वासरांची संख्या हि कमी मिळते.
            अशाप्रकारे जनावरांतील माज त्यांच्या लक्षणावरून योग्य रीतीने ओळखल्यास नियमित प्रजनन होण्यास मदत होईल आणि जास्तीत जास्त वासरे जन्माला येतील व शेतकऱ्याचा जास्तीत जास्त फायदा होईल

तसेच बऱ्याच गाई / म्हशी व्याल्यानंतर - महिन्यांनी माजावर येतात. परंतु - महिन्यात फळवल्यास गाभण राहिल्यास दूध उत्पादन कमी होईल या भितीने गैरसमजामुळे बरेचसे पशुपालक गाई / म्हशींच्या नियमितपणे येणाऱ्या माजाकडे दुर्लक्ष करतात. त्यामुळे अशा जनावरांचे दूध उत्पादन कमी झाल्यानंतर अशी जनावरे लवकर माजावर येत नाहीत कारण त्यांचा प्रथिनयुक्त खुराक कमी करण्यात येतो. अशाप्रकारे गाई / म्हशी वारंवार उलटणे या समस्यांमुळे जनावरांत वाझंपणा येतो. गाई / म्हशींतील वांझपणा त्यांची प्रजोत्पादन क्षमता उत्पादन कमी होवून पशुपालकांना तोटा सहन करावा लागतो.
      पशुपालकांना प्रत्येक जनवराची लैंगिक तपासणी नियमितपणे करून घेतली पाहिजे. जनावर गाभण असो वा वांझ, रोगी असो वा निरोगी, नियमितपणे लैंगिक तपासणी करून घ्यावी. जनावरे लवकर वयात येणे, माजावरील जनावरे लवकर ओळखता येऊन योग्य वेळी भरवली जाणे, गाभण काळात देखभाल होणे, प्रसूति सुलभ होणे, व्यालेले जनावर माजावर येऊन पुन्हा गाभण रहाणे या गोष्टींकडे पशुपालकाने सतत लक्ष पुरविल्यास त्यासाठी पशुवैद्यकाकडून जनावराची नियमित लैंगिक तपासणी केल्यास जनावरांकडून अधिक फायदा मिळवता येऊ शकतो

गाई म्हशींमध्ये विविध कारणांमुळे वंध्यत्व येते
त्यापैकी प्रमुख कारणे खालीलप्रमाणे :
         असंतुलित आहारामुळे होणारे कुपोषण
         जीवनसत्वे खनिज मिश्रणाचा अभाव कमतरता.
         गर्भाशयाचे आजार दोष ( उदा. गर्भाशयाचा दाह, बीजांडदोष इत्यादी)
         गर्भाशयाच्या आजाराचा इतिहास (उदा. वार अडकणे, मायांग बाहेर येणे,गाभडणे इत्यादी)
         बाह्य कीटक (गोचिड, गोमाशा, पिसवा इत्यादी) आंतरकृमी / जंताचा प्रादुर्भाव
         सांसग्रिक लैंगिक दोष वळूमधील शुक्राणु दोष
         पशुपालकांमधील गैरसमज अंधश्रद्धा.
         दैनंदिन पशुपालन व्यवस्थापनातील / देखभालील त्रुटी

वंध्यत्व निवारणासाठी प्रमुख उपाययोजना

         आपल्याकडील गाई म्हशींची  लैंगिक तपासणी तज्ञ पशुवैद्यकाकडुन व्याल्यानंतर लगेचच करून घ्यावी. तसेच व्याल्यानंतर 3 महिन्यात गाई म्हशी माजावर आल्यास तात्काळ पशुवैद्यकाकडुन गर्भाशयाची तपासणी करवून घ्यावी गाई म्हशी माजावर येण्यासाठी योग्य औषधोपचार करवून घ्यावेत.
          मुका माज दाखवणाऱ्या गाई म्हशीत जनावर अंदाजे कधी माजावर येईल माज ओळखण्याच्या दृष्टीने पशुवैद्यकाचे मार्गदर्शन घ्यावे. त्यामुळे गाई म्हशीतील कृत्रिम रेतनाची / फळवण्याची वेळ कळू शकते.
          आपल्या जनावरांना नियमितपणे जंतनिर्मूलनासाठी औषधी द्यावीत अंगावरील गोचिड, गोमाशा, उवा पिसवा यांचे निवारण निर्मूलनासाठी योग्य किटकनाशकाचा वापर काळजीपूर्वक पशुवैद्यकाच्या सल्ल्याने करावा. तसेच आपल्या जनावरांचे नियमितपणे लसीकरण करून घ्यावे.
          रोज सकाळी सायंकाळी नियमित गाई म्हशींतील माजाची पाहणी करावी. तसेच गाई म्हशीत कृत्रिम रेतनाची / नैसर्गिक संयोगाच्या तारखेची व्यवस्थापनातील इतर महत्वांच्या बाबींची नोंद ठेवावी.
          आपल्या जनावरांना योग्य संतुलित आहार दुधउत्पादनानुसार पूरक आहार द्यावा. आहारात जीवनसत्वे अंदाजे ५० ग्रॅम खनिज मिश्रण नियमितपणे द्यावे.

       कोणत्याही प्रकारचे वर नमूद केल्या प्रमाणे  किंवा त्या व्यतिरिक्त लक्षणे आढळल्यास त्वरित पशुवैद्यकीयांकडून योग्य ते उपचार करून घ्यावेत  

No comments:

Post a Comment