जनावारांतील जीवनसत्वाचे कार्य महत्व, अभाव व उपाय
शरीराच्या निकोप वाढीसाठी व शरीर क्रियेसाठी
आहारातून आवश्यक जीवनसत्वांची गरज असते.त्यांच्या कमतरतेमुळे जनावरांचे स्वास्थ्य
बिघडते.
गुरांच्या आहारात प्रथिने,पिष्ठमय पदार्थ,स्निग्ध
पदार्थ व खनिज द्रव्ये या अन्नद्रव्याशिवाय इतर काही द्रव्यांची आवश्यकता असते. ही
पोषणद्रव्ये सेंद्रिय संयुक्त पदार्थ असून शरीरवाढीसाठी शरीर स्वास्थ्याकरिता
अतिशय अल्पप्रमाणात लागतात. त्यांनाच “व्हिटॅमिन” म्हणजेच “जीवनसत्त्वे” म्हणतात.
जीवनसत्वे हे सेंद्रिय पदार्थ असून शरीरातील उतींमध्ये
नैसर्गिक चायापचायासाठी अल्प प्रमाणात गरजेचे असते.ही सेंद्रिय द्रव्ये कुठल्याही प्रकारची
ऊर्जा शरीरास पुरवत नाही परंतु त्याचे आहारात असणे जीवनावश्यक आहे.
आहारातून ही जीवनसत्वे मुबलक प्रमाणात मिळतात
परंतु त्यांचा अभाव असल्यास विशिष्ठ रोग होतात. जीवनसत्वांचा साठा करून ठेऊ शकत
नाही कारण हवेशी संपर्क आल्यास ती नष्ट होतात.
जनावरांच्या शरीराचे आरोग्य टिकवण्यासाठी जीवनसत्वे
आवश्यक आहेत. काही जीवनसत्वे शरीरातच तयार होतात तर काही आहारातून घ्यावी लागतात.जी
जीवनसत्वे आहारतून मिळत नाही त्याच्या अभावाने शरीरात रोग होतात व ते मिळताच बरे
होतात.
जीवनसत्वे
दोन प्रकारची आहेत.
१)
स्निग्धात विरघळणारी अ ,ड, इ, के
२)
पाण्यात विरघळणारी ब, क
१) स्निग्धात विरघळणारी जीवनसत्वे
अ) जीवनसत्व अ :
फायदे: यामुळे जनावरांच्या
पचनसंस्थेच्या अवयवांचा आतील स्तर चांगला राहतो.
जनावरांच्या
वाढीसाठी, रोग प्रतिकारक शक्तीसाठी व प्रजननक्षमता अबाधित ठेवण्यासाठी हे
जीवनसत्त्व उपयोगी आहे.
अभाव: याच्या
अभावाने रातआंधळेपणा होतो.
वर
न पडणे, जनावर उशिरा माजावर येणे, स्रीबीजांड बाहेर पडण्याची क्रिया लांबणे. मुका
माज असे अभाव दिसून येतात.
उपलब्धता: हिरवी मका, हिरवे गवत, दुध, गाजर
आ)जीवनसत्व ड:
फायदे: जीवनसत्व ड हे कॅल्शियम व
स्फुरदाचे रक्तात रुपांतर करण्यासाठी आवश्यक असते.
अभाव: याच्या अभावाने मुडदुस हा रोग होतो.
रक्तातीलकॅल्शियम व स्फुरदाचे शोषणयोग्य प्रकारे होते.
दातांचा
विकार व हाडे ठिसूळ बनतात.
गुडघ्यामध्ये
पोकळी, सांध्याचा आजार असे विकार होतात.
उपलब्धता:कोवळ्या
सूर्यकिरणापासून
जनावरे काही वेळ उन्हात बांधावीत.
उन्हात
वाळलेलेगवत भरपूर प्रमाणात द्यावे.
इ) जीवनसत्व इ:
फायदे: जीवनसत्व इ व सेलेनियमचा संयुक्त
पुरवठा केल्यास जनावरे उलटण्याचे प्रमाण कमी होते.
शरीर निकोप
ठेवण्यासाठी तसेच कातडी निरीगी ठेवण्यासाठी फायद्याचे आहे.
प्रजननासाठी
आवश्यक
अभाव: हृदयाच्या स्नायुवर विपरीत परिणाम होतो.
त्याच्या कमतरतेमुळे प्रजननाचे व वंधत्वाचे रोग होतात.
जनावर
माजावर येत नाही.
उपलब्धता: प्रजनन
क्षमतेची उणीवदिसून आल्यास जीवनसत्व इ चे इंजेक्शन द्यावे.
हिरवे पदार्थ/ चारा व
धान्य पदार्थात रुपांतर करून देणे.
ई) जीवनसत्व के:
फायदे: रक्त
गोठविण्यासाठी फायदेशीर
अभाव: जखमेतून रक्त स्राव
जास्त होतो.
उपलब्धता:
सर्व प्रकारचा हिरवा चारा
हे जीवनसत्व खाद्यातून द्यावे लागते.
२) पाण्यात विरघळणारी जीवनसत्वे
अ) जीवनसत्व ब:
फायदे: मज्जातंतू कार्यान्वीत होण्यासाठी फायद्याचे
चयापचयाच्या क्रियेला चालना देण्यासाठी महत्वाचे आहे.
अभाव: याच्या अभावी
मज्जातंतू सुजणे, स्नायुंची हालचाल न होणे ही लक्षणे दिसतात.
उपलब्धता:
आ) जीवनसत्व क:
फायदे: रोगप्रतिकारशक्ती तसेच जखमा भरून येण्यासाठी फायदेशीर आहे.
अभाव: स्कर्व्ही हा रोग
होतो.
उपलब्धता: संत्रा,
लिंबू, चिंच
तसेच
इंजेक्शनने सुद्धा जीवनसत्वक दिले जाते.
जनावरांच्या समतोल आहारात जीवनसत्वांची
कमतरताभासल्यास कृत्रिमरीत्या जीवनसत्वे खाद्यातून अथवा इंजेक्शनद्वारे द्यावीत.
त्यामुळे जनावरांचे आरोग्य व्यवस्थित ठेवण्यास मदत होईल.
प्रा. अजय गवळी (मोबा.८००७४४१७०२)
No comments:
Post a Comment