Tuesday, 20 March 2018

रोगी, निरोगी जनावरांमधील फरक




      कोणत्याही रोगी जनावराची लक्षणे ही जनावर आजारी पडण्या आधीपासूनच दिसायला लागतात.त्यामुळे पशुपालकांनी आपल्या पशूंच्या हालचालींकडे बारकाईने लक्ष दिले पाहिजे. जनावरांच्या जखमा, भाजणे, शिंगे मोडणे, सूज येणे यांसारखे आजार आपल्याला डोळ्यांनी दिसून येतात परंतु सांसर्गिक गर्भपात, जननेंद्रियाचे रोग, कर्करोग यांसारख्या आजाराचे लक्षणे मात्र आधीपासूनच दिसायला लागतात ते पशुपालकांना समजले पाहिजे.
      यासाठी आपल्याला आधी रोगी व निरोगी जनावरांमधील फरक समजला पाहिजे. रोगी जनावराला झालेल्या रोगामुळे शरीराची नियमित क्रिया बदलते त्यामुळे जनावर अन्न खात नाही व वरचेवर तब्येत खराब होते व वजनही कमी होते.
      
        रोगी व निरोगी जनावरांमधील फरक खालीलप्रमाणे,

अवयव
निरोगी
रोगी / आजारी
कान
टवकारलेले, मोकळी हलणारी
कान पडलेले, न हलणारे
डोळे
पाणीदार
निस्तेज, पाणी वाहणारे
त्वचा
मऊ, गरम, सतेज
अंग गरम, केस उभारलेले, माश्या बसलेल्या
श्वास
संथ
धापा टाकत
खाणे
शांत, नियमितपणे
कमी खाणे
हृदयाचे ठोके
७२
७२ पेक्षा जास्त १५० पर्यंत
तापमाप
३७
३७ पेक्षा जास्त
चालणे
व्यवस्थित चालते
चालणे कमी होते
शेण
किंचित काळसर, पिंगट
वाळलेले कमी पातळ
तोंडाचा भाग
ओलसर, दवबिंदू प्रमाणे
कोरडा पडलेला
शेपटी
हालवते
शेपटी हालवत नाही. शेणाने भरलेली
वृत्ती
अवखळ, तरतरीत, हुंदडणे
मंद, स्तब्ध, उभे राहणे किंवा बसणे.
     

      अश्या पद्धतीने पशुपालकांनी आपल्या पशुंच्या हालचालींकडे लक्ष द्यावे व रोगी जनावरांचे लक्षण दिसल्यास पशुवैदयकीय अधिकाऱ्याचा सल्ला घ्यावा व लवकरात लवकर उपचार करून घ्यावे. त्यामुळे मोठ्यात मोठी हाणी टाळता येईन.

                        प्रा. अजय गवळी ८००७४४१७०२

No comments:

Post a Comment