Wednesday, 21 March 2018

भेसळयुक्त दुध ओळखण्याच्या पद्धती...

भेसळयुक्त दुध ओळखण्याच्या पद्धती...


बाजारात बहुतांशी भेसळयुक्त दुध आपणास बघायला मिळते आणि अशा भेसळयुक्त दुधामुळे आपल्या आरोग्यास धोका निर्माण होतो हे तर आपल्याला माहितच आहे. पण आता हे भेसळयुक्त दुध ओळखायचे कसे..? हा प्रश्न तर आपणा सर्वांचाच असतो. आपण हे दुध फक्त नजरेने, वासाने किंवा चवीने ओळखू शकत नाही. त्यासाठी काही रासायनिक चाचण्या असतात त्या करणे हि अतिशय आवश्यक आहे. या चाचण्या खर्चिक आहे. तसेच या चाचण्या प्रयोगशाळेतच कराव्या लागतात. या चाचण्या करण्यासाठी स्वतंत्र यंत्रणा आहे या चाचण्या गतिमान करणे आवश्यक आहे. भेसळ तंत्र हे सतत बदलत असते त्यामुळे अनुरूप चाचण्या करणे गरजेचे आहे.
भेसळयुक्त दुधाच्या विविध चाचण्या:
.दुधातील पाण्याची भेसळ ओळखणे: लेक्टोमीटर च्या सहाय्याने दुधात पाणी मिसळलेले आहे कि नाही हे आपणास समजू शकते. पण कायदेशीर हे सिद्ध करणे शक्य होत नाही. त्यासाठी फ्रीझिंग पौइंट टेस्ट आहे ती वेळखाऊ खर्चिक आहे.
दुधात साखरेची भेसळ ओळखणे: साखरयुक्त दुध ओळखण्यासाठीही चाचणी केली जाते. या चाचणीसाठी १० मिली दुधाचा नमुना परीक्षा नळीत घ्यावा. त्यात मिली संपृक्त हायड्रोक्लोरिक आम्ल टाकावे. त्याच प्रमाणे . ग्राम रिसॉरसिनील पावडर टाकून चांगले हलवून नळी गरम पाण्यात ठेवा. जर दुधात तांबडा रंग आला तर दुधात साखर आहे असे समजले जाते.
दुधातील मैद्याची भेसळ ओळखणे: परीक्षा नळीत मिली  एवढा दुधाचा नमुना घ्या. त्यात दोन ते तीन थेंब % आयोडीनचे द्रावण मिसळा. मिश्रण कोमट पाण्यात ठेवा. मिश्रणाला निळा रंग आल्यास त्या दुधात स्टार्च/मैदा आहे असे समजावे.
दुधात सोड्याची भेसळ ओळखणे: यासाठी रोझालिक टेस्ट करतात. त्याकरीता दुधाचा जो नमुना तपासायचा असेल त्यातील मिली दुध परीक्षा नळीत घ्या. त्यात मिली अल्कोहोल टाकावे एक टक्का क्षमतेचे रोझालिक असिड चे अल्कोहोल केलेले द्रावनाचे चार ते पाच थेंब टाकावे. जर दुधाचा रंग लालसर झाला तर त्या दुधात सोडा मिसळलेला आहे असे निदर्शनात येते.
दुधात हायड्रोजन पेरोक्साईड मिसळलेले ओळखणे: मिली दुध काचेच्या परीक्षा नळीत घ्यावे. % पेरोफिनैल डाय अमाइनद्रावणाचे पाच थेंब दुधात टाकून हलवावे. मिश्रणास निळा रंग आल्यास दुधात हायड्रोजन पेरोक्साईड मिसळेले आहे असे समजते.
दुधात फोरम्यालीन मिसळल्याचे ओळखणे: काचेच्या परीक्षा नळीत २० मिली दुधाचा नमुना घ्या. परीक्षा नळीच्या बाजूने हळुवारपणे सल्फ्युरिक आम्ल सोडा. नळीतील मिश्रणाला हलवू नका. परीक्षा नळीच्या बुडाशी निळसर किंवा जांभळ्या रंगाची कडा आढळल्यास दुधात फोरम्यालीन मिसळले आहे असे समजावे.
दुधातील युरियाची भेसळ ओळखणे: परीक्षा नळीत मिली दुधाचा नमुना घ्या. त्यात मिली म्हणजेच १६% parodye methyle aminobenal-dehyde द्रावण मिसळावा. मिश्रणाला गडद पिवळा रंग आल्यास दुधात युरियाची भेसळ आहे असे समजावे.
दुधातील अमोनियम सल्फेटची भेसळ ओळखणे: परीक्षा नळीत मिली दुध घ्या. मिली सोडीअम हायड्रोक्साईडचे द्रावण टाका. पुढे . मिली म्हणजेच % फिनेल द्रावण टाका. २० सेकंद गरम करा. मिश्रणाला निळा रंग आल्यात त्यात अमोनिअम सल्फेटची भेसळ आहे असे समजावे.
दुधातील मिठाची भेसळ ओळखणे: परीक्षा नळीत मिलि दुधाचा नमुना घ्या. त्यात .% सिल्वर नायट्रेट ५ मिली % पोटेशियम क्रोमेट द्रवणाचे - थेंब टाका. मिश्रण पिवळे झाले तर दुधात मीठ मिसळल्याचे समजते.
दुधात साबणाचा चुरा मिसळल्याचे ओळखणे: परीक्षा नळीत १० मिली दुधाचा नमुना घ्या. त्यात १० मिली गरम पाणी टाकून हलवा. पुढे त्यात - थेंब phenopthelyne द्रावण टाकून हलवा. जर दुधाला निळा रंग आला तर त्या साबणाचा चुरा चुरा मिसळल्याचे समजावे.
१३.दुधात मिसळलेले डीटर्जट ओळखणे: परीक्षा नळीत मिली एवढा दुधाचा नमुना घ्या.त्यात . मिली bromocrisole purple द्रावण टाका.दुधाच्या द्रवानाला जांभळा रंग आल्यास त्या दुधात डिटर्जट मिसळल्याचे समजावे.
१४.दुधात स्कीम मिल्क पावडर मिसळल्याचे ओळखणे: परीक्षा नळीत थोडा दुधाचा नमुना घ्या. त्यात तीव्र नायट्रिक आम्ल टाका. मिश्रणाला जर केशरी/नारंगी रंग आल्यास दुधात स्कीम मिल्क पावडर असल्याचे समजते . आणि मिश्रणाला जे पिवळा रंग आला तर दुधात स्कीम मिल्क पावडर नसल्याचे समजावे.
      अशा प्रकारे वरील दिलेल्या चाचण्या शाश्रोक्त पद्धतींचा वापर करून केल्यास दुधातील भेसळ ओळखण्यास मदत होईल

  

प्रा.अजय गवळी८००७४४१७०२